कोकणवासियांचा सर्वाधार | महिमा जयाचा अपरंपार || श्री देव दयाळु कुणकेश्वर | मायबाप माझा ||१||
अनाथांचा नाथ त्रैलोक्यनाथ | नवनाथांचा नाथ आदिनाथ || श्री देव कुणकेश्वर जगन्नाथ | मायबाप माझा ||२||
शिवभक्तांना आहे अति प्रिय | करी कोटिकल्मषांचा लय || श्री देव कुणकेश्वर वर्णू काय | मायबाप माझा ||३||
देव कुणकेश्वराच्या भेटीस येताना
महादेवाच्या पिंडीवर देव भेटीचा सोहळा असा संपन्न होतो